LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची धामधूम; देणगीदारांचा सन्मान समारंभ उत्साहात पार*

Advertisement
कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची धामधूम; देणगीदारांचा सन्मान समारंभ उत्साहात पार

कंग्राळी बुद्रुक (ता. बेळगाव) येथे येत्या २८ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या महालक्ष्मी देवी यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. परंपरेचा वारसा जपत गावात भक्तीचा माहोल तयार झाला असून, रविवारी (१२ ऑक्टोबर २०२५) देवी मंदिरात देणगीदार सन्मान सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी देवीच्या मंगलपूजेनं करण्यात आली. त्यानंतर यात्रा समितीचे अध्यक्ष जयराम पाटील, उपाध्यक्ष अनिल पावशे आणि पदाधिकारी यांच्या हस्ते देणगीदारांचा श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

समारंभात गावकऱ्यांच्या उदार सहभागाची झलक स्पष्टपणे दिसून आली. विविध देणगीदारांनी यात्रेच्या आयोजनासाठी मनमोकळ्या हाताने मदत केली. त्यात दत्ता रामा पाटील व पांडु रामा पाटील यांनी ५१ हजार रुपये, बसनगौडा जी. पाटील यांनी ११,१२१ रुपये, उमेश आचार्य परिवार व विद्या संजय भातकांडे यांनी प्रत्येकी १० हजार रुपये, किरण यल्लाप्पा कोलते, बसाप्पा मल्लाप्पा कुलगोड व जगन्नाथ लक्ष्मण चव्हाण यांनी प्रत्येकी सुमारे ५ हजार रुपये, तसेच नवीन आचार्य यांनी २,१०० रुपये आणि यशवंत पाटील यांनी ५,०११ रुपये अशी देणगी अर्पण केली.

या देणग्यांमुळे यात्रेच्या तयारीला बळ मिळाले असून गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सन्मान सोहळ्याला उत्सवी रंग चढवला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येकाचा सहभाग हीच यात्रेची खरी शान आहे. सामूहिक भावनेतूनच हा पारंपरिक उत्सव अधिक तेजस्वी होईल.”
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*