बेळगांव ता 23. अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा दहावीचा निकाल 97.82% लागला आहे .
एकूण 138 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यात विशेष गुणवत्ता 28, फर्स्ट क्लास 77, सेकंड क्लास 20, व पास क्लास 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन शाळेमध्ये पूर्वी अमोल शेट्टी हिने 606 गुणासह 96.96% गुण घेत शाळेत प्रथम, श्रावणी पंकज मोरे हिने 603 गुणासह 96.48% गुण घेत द्वितीय क्रमांक.सहाना कामण्णा सोलंणकर हिने 602 गुणासह 96.32% घेत तृतीय क्रमांक.
मनाली अनिल जुवेकर हिने 595 गुणासह 95.20% घेत चौथा क्रमांक. भक्ती विश्वनाथ कुंभार हिने 593 गुणासह 94.88 गुण घेत पाचवा.
सायना भरमा मजुकर हिने 587 गुणासह 93.92% घेत सहावा. आकांक्षा दत्तप्रसाद बोकमुरकर हिने 583 गुणासह 93.28 गुण घेत सातवा. स्नेहा विनोद धनवाडे हिने 578 गुणासह 92, 48% घेत आठवा. वर्षा परशुराम परीट हिने 573 गुण 91.68 टक्के घेत नववा ,सर्वेश बाळू तेवरे यांने 571 गुणासह 91.36% घेत दहावा क्रमांक पटकाविला आहे.
वरील विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे व शिक्षक वर्गानी खास अभिनंदन केले आहे.
आय डी फोटो

