LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कोनेवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा*

Advertisement
बेळगांव:शौर्य, धर्मनिष्ठा आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, कोनेवाडी गावात त्यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे पवित्र कार्य सुरू झाले आहे.

या निमित्ताने श्रीराम सेवा युवक संघ कोनेवाडी, श्रीराम सेना हिंदुस्तान आणि ग्रामस्थ कोनेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

या शोभायात्रेची सुरुवात अनगोळ येथील जे. जे. पाटील मुर्तीशाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर मूर्तीची भव्य शोभायात्रा तुरमुरी ते कोनेवाडी मार्गावर उत्साहात काढण्यात आली.

गावात आगमन होताच संपूर्ण कोनेवाडी भगव्या रंगात न्हाऊन निघाली. प्रत्येक घरातून स्त्रियांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाण्याने अभिषेक व आरती करून स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, जयजयकार आणि भगवा झेंडा यामुळे वातावरण शिवमय झाले होते.

या सोहळ्यात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर ते होते स्वराज्याचे शिल्पकार, न्यायाचे रक्षक आणि जनतेच्या हृदयातील प्रेरणास्थान — या विचारांची झलक या कार्यक्रमातून दिसून आली.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*