दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने ५८ व्या फ्र. एडी मेमोरियल आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
२९ ऑक्टोबर २०२६ रोजी सेंट पॉल्स पी.यू. कॉलेजच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ज्योती सेंट्रल स्कूलच्या संघाने जैन हेरिटेज स्कूलच्या संघाशी चुरशीची लढत दिली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, सांघिक भावनेचे, शिस्तीचे आणि जिद्दीचे दर्शन या स्पर्धेत घडले.
या यशामागे खेळाडूंची मेहनत आणि प्रशिक्षक श्री. मनोज जाधव यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. याबद्दल शाळेच्या एस्.एम्.सी.कमिटीचे चेअरमन प्रो.श्री.आर.के.पाटील, व्हाइस चेअरमन प्रो.श्री.आर.एस्.पाटील, सेक्रेटरी प्रो.श्री.नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री.मनोहर करडी यांनी विजयी संघाचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवात भर पडली आहे.