डॉ. गणेश कानडे यांना राज्यस्तरीय संगीत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..
कोगनोळी ; प्रतिनिधी..
मुळगाव कोगनोळी ता. निपाणी व गेल्या अनेक वर्षापासून मुंबई येथे वास्तव्यात असणारे डॉ. गणेश रावसाहेब कानडे यांना स्विफ्टलिफ्ट मीडिया ग्रुपच्या वतीने नुकतेच राज्यस्तरीय संगीत शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार अमृततुल्य येवलेचे व्यवस्थापकीय संचालक नवनाथ येवले आणि स्विफ्टलिफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निलेश साबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या मिळालेल्या पुरस्कारामुळे गणेश कानडे यांचे सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छा वर्षा होत आहे. कानडे यांना लहानपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती.
ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात "हम दिल दे चुके सनम" या चित्रपटातील "तडप तडप" हे गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली होती

