तृतीयपंथीयांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.आपल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
कर्नाटक सरकारच्या विविध योजना आणि सुविधाचा तृतीयपंथीयांना सर्वासामान्य जनते प्रमाणे लाभ मिळावा. सरकारच्या शक्ती योजने अंतर्गत मोफत प्रवास करण्यासाठी तृतीयपंथीयांना लाभ मिळावा.
सरकारच्या ग्रामीण आणि शहरी भागातील वसति योजनेतून घर उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा दिल्या जाव्या. वैयक्तिक आणि सामूहिक शेती करण्यासाठी सरकारने मदत करावी. अन्य व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या कृषी योजना आणि सवलतींचा लाभ मिळावा. आम्हाला सर्वसामान्य जनते प्रमाणे योजना, सवलतींचा लाभ मिळावा. तृतीयपंथीय म्हणून आमच्याशी भेदभाव केला जावू नये असे तृतीयपंथीयांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

