LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*न्यायाधीशांसमोरच महिलेवर कुऱ्हाडीने हल्ल्याचा प्रयत्न*

Advertisement
बेळगाव प्रतिनिधी

अथणी येथील न्यायालयीन परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण कोर्टात खळबळ उडाली. न्यायालयीन कामकाज सुरू असताना एका महिलेवर समोरच प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.

हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय 50) असे असून, त्यांच्यावर स्थानिक दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात कोतनटी येथील बाबासाहेब चव्हाण याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

प्राथमिक माहितीनुसार, मीनाक्षी आणि आरोपी बाबासाहेब यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संपत्ती संदर्भात गंभीर वाद सुरू होता. मंगळवारी सकाळी मीनाक्षी न्यायालयात आल्या असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला.
जीव वाचवण्यासाठी त्या कोर्ट हॉलमध्ये धावत गेल्या; मात्र आरोपीने न्यायालयीन कक्षातच कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार प्रधान दिवाणी न्यायाधीशांच्या समोरच घडल्याने सर्वत्र भीती और आश्चर्य यांचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवरही अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली असून, कोर्टातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*