बेळगाव : बेकिंनकिरे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी अंदाजे ₹2 कोटी 60 लाखांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. रस्ता बांधकामांसह अनेक मूलभूत सुविधा उभारण्याच्या उद्देशाने या कामांचे भूमिपूजन स्थानिक जनप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
कामाला औपचारिक सुरुवात मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आली. नव्या रस्ते प्रकल्पांमुळे गावाच्या संपर्क सुविधांमध्ये मोठा बदल होणार असून स्थानिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाला काडा अध्यक्ष युवराज अण्णा कदम, गावातील ज्येष्ठ नागरिक, निवडून आलेले प्रतिनिधी, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीनुसार या महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.
ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत गावाच्या प्रगतीसाठी हा टप्पा महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

