LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात अंतरराज्य दरोडेखोरांचा पर्दाफाश; लाखोंचा ऐवज ताब्यात*

Advertisement
बेळगाव: ठिळकवाडी पोलिसांनी शहरामध्ये चेन स्नॅचिंग व सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीमध्ये सामील असलेल्या अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत दोन दरोडेखोरांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी 10 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे नागराज बसप्पा हरणिशिकारी (19) आणि मन्नू दिपक राऊत (22) अशी आहेत. ठिळकवाडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी शहरातील विविध ठिकाणी सोन्याचे दागिने लांबविल्याची कबुली दिली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी 80.36 ग्रॅम सोन्याचे दागिने (मूल्य अंदाजे ₹9,15,000), ₹50,000 किमतीची मोटारसायकल, तसेच ₹60,000 किंमतीची दुसरी मोटारसायकल असा एकूण ₹10,25,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कारवाई ठिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पूजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विश्वनाथ घंटामठ, प्रभाकर डोळी, तसेच कर्मचारी महेश पाटील, एस.एम. करलिंगण्णवर, लाडजीसाब मुल्तानी, नागेंद्र तळवार आणि सतीश गिरीरवर यांच्या पथकाने केली.

तपासात आणखीही प्रकरणे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*