LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*भाविपच्या राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलला प्रथम क्रमांक*

Advertisement
भाविपच्या राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या
लव्ह डेल सेंट्रल स्कूलला प्रथम क्रमांक

भारत विकास परिषदेच्या रायचूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत बेळगावच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता त्यांची पुढील आठवड्यात तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या दक्षिण भारत विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. बेळगाव शाखेअंतर्गत झालेल्या समूहगीत स्पर्धेत सहभागी 21 शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

विजेत्या समूहात अद्विती शेठ, त्रिशाना मित्रा, रिषिका कोंगवाड, राघवी गस्ती, अदिती उंगेर, आकांक्षा नाईक, लाईबाह के., हृत्विका कंग्राळकर यांचा सहभाग होता. त्यांना संगीत शिक्षक विनायक मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच 'भारत को जानो' प्रश्नमंजुषा स्पर्धेत वरिष्ठ विभागात बेळगावच्या भरतेश इंग्रजी माध्यम शाळेचे विद्यार्थी प्रसन्ना ए. आणि यश धर्मोजी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर कनिष्ठ विभागात संत मीरा स्कूल हिंडलगाच्या विघ्नेश मन्नुरकर व वैष्णव मनवाडकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन खास गौरविण्यात आले.

रायचूर येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी पुरुषोत्तमदास इनानी, प्रांत अध्यक्ष एस. एस. हिरेमठ, डॉ. आनंदतीर्थ फडणीस, संघटन सचिव विनायक घोडेकर, बेळगाव शाखाध्यक्ष विनायक मोरे, तिरुपती जोशी, स्वामीराव देशपांडे, अक्षता मोरे तसेच सर्व शाखांचे पदाधिकारी, शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते. भारत विकास परिषद बेळगाव शाखेच्यावतीने विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी सदिच्छा देण्यात आल्या.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*