बेळगाव (प्रतिनिधी):
विजयनगर, हिंडलगा परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. मंगला सुरेश अंगडी यांच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या नव्या बसस्थानकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमात बेळगाव भाजप ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांनी भाषण करताना सांगितले की, “हे बसस्थानक अनेक वर्षांपासून विजय नगरवासीयांचे स्वप्न होते. दिवंगत अजीत हळकर्णी व मितुन उसुंलकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज हे स्वप्न साकार झाले आहे. या स्थानकाचे उद्घाटन अजीत हळकर्णी यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले असून, भाजप कार्यकर्त्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.”
या वेळी हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर, लक्ष्मी पर्मेकर, मिथुन उसुंलकर, लता उसुंलकर, भाग्यश्री कोकितकर, अजीत हळकर्णी परिवार, विलास तहसीलदार यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
https://youtube.com/shorts/n1Q5ZBqEsrw?si=ISiEkWok1sIFGa6k
या बसस्थानकामुळे विजयनगर परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी मोठी सुविधा मिळणार असून, वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

