बेळगाव (प्रतिनिधी):
शिवबसवनगर, बेळगाव येथील श्री ज्योतिबा मंदिरात येत्या रविवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य दीपोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे.
मंदिर समितीकडून दिलेल्या माहितीनुसार, या दीपोत्सवाच्या निमित्ताने 5001 पारंपरिक दिव्यांची रोषणाई करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर परिसर दीपप्रकाशाने उजळून निघणार असून भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.
कार्यक्रमानुसार सायंकाळी 7 वाजता महाआरती आणि त्यानंतर सायंकाळी 8 वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. मंदिर समितीने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे.
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती अपेक्षित असल्याने, व्यवस्थापनाने सर्व सोयी-सुविधांची विशेष तयारी केली आहे.

