बेळगाव :
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट घोडदौड करत आलेली गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी समृद्धी गुणवंत पाटील हिने यंदाच्या के-सेट (KSET) परीक्षेत वाणिज्य शाखेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
एम.कॉममध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या समृद्धीने दहावीपासून ते एम.कॉमपर्यंत सर्व शिक्षण स्तरांवर 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
प्रसिद्ध साहित्यिक गुणवंत पाटील यांच्या कन्या असलेल्या समृद्धीने मेहनत, सातत्य आणि अभ्यासातील निष्ठेच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत असून बेळगावातील विद्यार्थी आणि पालकवर्गासाठी हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

