बेळगाव :
राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रात बेळगावातील खेळाडू पुन्हा एकदा ठसा उमटवत आहेत. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर सौरभ साळोखे याने प्रभावी कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली.
सुमारे 900 हून अधिक स्पर्धकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सौरभने दाखवलेल्या गती, संतुलन आणि कौशल्यामुळे परीक्षकांसह उपस्थित क्रीडारसिकांचे कौतुक मिळाले.
सौरभ साळोखे याला सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे.
याशिवाय त्याला डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, प्रेरणा घाटगे, गुड शेफर्ड स्कूलच्या प्राचार्या प्रचिती आंबेकर, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर तसेच पालकांचे भक्कम सहकार्य व प्रोत्साहन मिळत आहे.
या यशामुळे बेळगावातील स्केटिंग क्षेत्रात आणखी प्रेरणा निर्माण झाली असून सौरभवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

