LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*हिंडलगा धावपटूंचे दुहेरी यश; रोटरी हाफ मॅरेथॉनमध्ये चमकदार विजय*

Advertisement
हिंडलगा धावपटूंचे दुहेरी यश; रोटरी हाफ मॅरेथॉनमध्ये चमकदार विजय

बेळगावातील रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या पुढाकाराने रविवारी पार पडलेल्या रोटरी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत हिंडलगा गावातील दोन धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आरोग्य जनजागृती आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यासाठी आयोजित या मॅरेथॉनमध्ये विविध अंतर आणि वयोगटांत शेकडो धावपटूंनी सहभाग नोंदविला.

ज्येष्ठ वयोगटातील १० किमी धावण्याच्या स्पर्धेत हिंडलगाचे अनुभवी धावपटू सुरेश सांगावकर यांनी दमदार वेग आणि सहनशक्तीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. त्यांनी ६० वर्षांवरील गटात आपली सरस कामगिरी कायम राखत पुन्हा एकदा ऍथलेटिक्समधील आपला दबदबा सिद्ध केला. सांगावकर यांनी यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले असून त्यांचा अनुभव आजही तरुण धावपटूंना प्रेरणा देणारा आहे.

याच स्पर्धेत ५५ वर्षांवरील गटात निवृत्त सुभेदार मेजर, ऑनररी कॅप्टन चंद्रकांत कडोलकर यांनी प्रभावी धाव सादर करत रौप्य पदकाची कमाई केली. सैनिकी शिस्त आणि नियमित सराव यांच्या जोरावर त्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय झेप घेतली.

दोन्ही खेळाडूंच्या या कामगिरीचे गावासह संपूर्ण परिसरात कौतुक केले जात असून, स्थानिक क्रीडाक्षेत्रासाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*