॥ कंग्राळी खुर्द येथे एस क्रो योजनेतून गटार काम ॥
चार गल्लीतील नागरीकातून समाधान
कंग्राळी खुर्द - येथील ओंकार गल्लीच्या टोकांपासून मुख्य रस्त्या पर्यंत एस क्रो अनुदानातून गटार काम पूर्णत्वास आले असून या अत्यंत गरजेच्या कामामुळे चार गल्लीतील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
या गावातील वार्ड क्रमांक 8 मधील ओंकार गल्ली , नागनाथ गल्ली , थोरवत गल्ली व रामदेव गल्लीतील काही भागांतील पाणी गटार नसलेले ओंकार गल्लीच्या टोकाला थांबत होते . हे पाणी पाझरून लगतच्या विहिरी तसेच खालील बाजूच्या घरात शिरत होते याचा परिसरातील नागरिकांनी मोठा त्रास होत होता त्यामुळे या वार्डाचे सदस्य महेश धामणेकर यांचेकडे गटार कामासाठी तगादा लावला होता त्यानुसार त्यांनी लोकांची समस्या लक्षात घेऊन प्रयत्न करून एस क्रो योजनेतून सुमारे चार लाखापेक्षा जास्त निधी मंजूर करून घेतला आणि या ठिकाणी गटार कामाची सुरवात करून आता ते काम पूर्णत्वास आले आहे . या गटारीसाठी आवश्यक जागा मा. अध्यक्ष भाऊ पाटील यांनी देऊन मोलाचे सहकार्य केले त्यामुळे हे काम करणे शक्य झाले आहे . या विकास कामाकडे पीडीओ गोपाळ नाईक उपध्यक्ष कल्लापा पाटील , सदस्य यल्लापा पाटील , प्रशांत पाटील , राकेश पाटील , वैजनाथ बेन्नाळकर , कमला पाटील व अन्य जातीने लक्ष देऊन काम करत आहेत .

