॥ कंग्राळी खुर्द येथे 2 डिसेंबर पासून भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धा ॥
विजेत्याला मिळणार रोख रु . 51111 / हजार तर उपविजेत्याला रू 25555 /
कंग्राळी खुर्द - येथील मराठा साम्राज्य स्पोर्ट क्लब च्या वतिने ग्रामदैवत श्री मसणाई देवी यात्रेनिमित भव्य हाफपीच कै. बी आय पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धांचे 2 डिसेंबर पासून आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु 51111 / व चषक तर उपविजेत्या संघाला रोख रु . 25555 / व चषक मिळणार आहे .
गेली 20 वर्षे होत असलेल्या या स्पर्धा मराठी शाळेच्या आवारात डे नाईट होणार असून मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे . या स्पर्धेच्या मुख्य बक्षिसा व्यतिरीक्त मालीकाविराला चांदीची चेन व लॉकेट व चषक, उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाजाला चांदीचे नाणे व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे . सामने 5 षटकाचे होणार असून इच्छूक संघानी 30 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी मराठा साम्राज्य स्पोर्टस क्लब कडे करावयाची आहेत अधिक माहितीसाठी पुंडलीक पाटील 8867501675 विनायक तम्माण्णाचे 8088082010 अजित पाटिल 9019435318 यांचेशी संपर्क साधावा .

