॥ कंग्राळी खुर्द येथील छ . शिवाजी महाराज मुर्ती लगतच्या गटारीच्या ऊर्वरीत कामालाही प्रारंभ ॥
यापुर्वी तीन विविध विकास योजनातून येथील कामे , परिसर झाला चकाचक
कंग्राळी खुर्द - या गावच्या प्रवेश द्वारापाशी असलेल्या छ .शिवाजी महाराज यांच्या मुर्ती लगतच्या राहिलेल्या गटार कामालाही प्रारंभ केला असून यापूर्वी तीन विविध विकास योजनातून या मुर्ती सभोवतालची कामे झाली असलेने आता संपुर्ण परीसर चकाचक झाला आहे .त्यामुळे शिवप्रेमीसह सर्व नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
या बाबत सविस्तर वृत्त असे की या गावच्या प्रवेश द्वारापाशी असलेल्या शिवमुर्ती सभोवताली जवळपास 25 फुट व्यासाभोवती संपुर्ण खड्डेमय रस्ता होता यासाठी ग्राप सदस्यासह ग्रामस्थांनी 3 वर्षे अनेक निवेदन देऊन आंदोलन केली होती शेवटी मंत्री हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून या भागाचे गेल्या वर्षी काँक्रीटीकरण करण्यात आले . तसेच या ठिकाणी तीन बाजूनी आलेल्या गटारींचे काम करूनही 25 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला होता त्यामुळे पावसाळ्यात गटारी तुंबून मुर्तीसभोवताली दुर्गंधीयुक्त पाणी व कचरा साठत होता यापैकी पाठीमागील गटारीचे व नाल्यावरील काँक्रीटीकरण 8 महिन्यापुर्वी 15 व्या वित्त आयोगातून सुमारे 16 लाख अनुदान खर्च करून , मराठी शाळेच्या बाजूने येणारया गटारीचे कामही 15 व्या वित्त आयोगातून एक महिण्यापुर्वीच सुमारे 8 लाख रुपये खर्च करून करण्यात आले .
आता राहिलेले गावात जाणारया मुख्य रस्त्याच्या उजवी कडील गटारीचे इस्त्रो ( ESROw ) योजनेतून सुमारे तीन लाख रुपये अनुदानातून 68 मीटर लांबीचे काम होत आहे . कामाचा ठेका ठेकेदार महेश पाटील याचेकडे असून या कामावरही ग्राप सदस्य यल्लापा पाटील, रमेश कांबळे, प्रशांत पाटील , वैजनाथ बेन्नाळकर , विनायक कम्मार , राकेश पाटील हे जातीने लक्ष घालून काम करून घेत आहेत . आता छ .शिवाजी महाराज मुर्ती परीसर चकाचक होत असलेने शिवप्रेमीसह सर्व नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

