॥ कंग्राळी खुर्द ग्रा प च्या वतिने 79 विकलांग व्यक्तीना गरजेचे साहित्य वाटप ॥
खेळाडूंचाही धनादेश देऊन सत्कार , एकूण 2 लाख 85 हजार 5% निधीतून खर्च
कंग्राळी खुर्द - या गावच्या ग्राप च्या वतिने कंग्राळी व अलतगा गावातील 79 शारीरीक विकलांग व्यक्तीना गरजेचे साहित्य वाटप करण्यात आले . याच बरोबर राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या कुस्ती व खोखो पटूंचा शाल श्रीफळ व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला या प्रोत्साहन कार्यासाठी ग्रा पं . अनुदानाच्या 5% रक्कम म्हणजे एकूण दोन लाख पंच्याऐशी हजार खर्च करण्यात आले .
शारीरीक विकलांग आणि खेळाडूना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महात्मा फुले मंगल कार्यालयात ग्राप अध्यक्षा दोडव्वा माळगी याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित ग्रा.प सदस्यांचा हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले . पिडीओ गोपाळ नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले तर अंध गायक शंकर मुतगेकर यांनी स्वागतगीत सादर केले . न्यायदान कमिटी अध्यक्ष रमेश कांबळे यांनी प्रास्ताविकांत उद्देश सांगतांना तालुक्यात अशा विकलांग व्यक्तीं व खेळाडूवर ग्राप विकास फंडाच्या 5% अनुदान खर्च करणारी पहिली ग्राप असून आम्ही नेहमीच गावच्या विकासाचा विचार केला आहे असे सांगितले . या वेळी ग्राप उपाध्यक्ष कल्लापा पाटील , सदस्य यल्लापा पाटील यानीही मनोगते व्यक्त करतांना तुम्ही आम्हाला कधीही हाक मार आम्ही ग्राप तुमच्या सदैव पाठीशी आहे असे विकलांग नागरीकांना आश्वासन दिले . त्यानंतर कंठीरवा केसरी पै.कामेश पाटील सीएम चषक विजेते पै. प्रेम जाधव , महिला कुस्तीपटू भक्ती पाटील अलतगा शाळेच्या खोखो पटू संचिता पाटील व समीक्षा पाटील यांचा शाल, श्रीफळ ,पुष्प व 15 ते 10 हजाराचे धनादेश देऊन सत्कार करण्यात आला . त्यानंतर वरील मान्यवरांसह महिला सदस्या लता पाटील , कमला पाटील , रेखा पावशे , मिना मुतगेकर , रेणूका पावशे , गिराजा सुतार यांचे हस्ते महिला तर सदस्य राकेश पाटील , विनायक कम्मार , पीडीओ गोपाळ नाईक , मदतनीस करीअप्पा चव्हाण यांच्या हस्ते पुरुष विकलांग व्यक्तींना कमोड खुर्ची , वॉटर बेड व चार्जिंग विधुत विजेरी अशा एकूण 80 पेक्षा जास्त जणांना देण्यात आले . यावेळी विकलांग व्यक्ती , त्यांचे नातेवाईक , ग्राप कर्मचारी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते . शेवटी आभार ग्रा प सदस्य प्रशांत पाटील यांनी मानले .
** विशेष म्हणजे पै. कामेश पाटील याने त्याला दिलेले प्रोत्साहनपर रू. 15 हजाराचे गरजू व गरीब विकलांग लोकांनाच साहित्य द्यावे असे जाहिर करून पैसे काढून ग्रापकडे सुपूर्त करू असे सांगितले ***

