कलमेश्वर गल्ली गणेश मंदिराचा २० वा वर्धापन दिन; गणेश जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कलमेश्वर गल्ली येथील श्री गणेश मंदिराचा २० वा वर्धापन दिन गुरुवारी गणेश जयंतीनिमित्त भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. या पावन प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
वर्धापन दिन व गणेश जयंतीनिमित्त सकाळी विधीवत गणहोम पूजा, त्यानंतर काकड आरती व महाआरती होणार आहे. दुपारी १ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा धार्मिक सोहळा कलमेश्वर युवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, गेल्या दोन दशकांपासून मंदिराच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. गणरायाच्या कृपेने परिसरात सुख, शांती व समृद्धी नांदावी, या भावनेतून हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
भाविकांनी वेळेत उपस्थित राहून या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

