LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*लोकसभा अचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी समिती नेत्यांना जामीन*

Advertisement
लोकसभा अचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी समिती नेत्यांना जामीन

बेळगाव : लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना धर्मवीर संभाजी महाराज चौक परिसरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीवरून दाखल झालेल्या प्रकरणात संबंधित नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे.मिरवणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक लोकांची गर्दी जमविण्यात आली होती तसेच बैलगाड्यांचा परवानगीशिवाय वापर करण्यात आल्याचा ठपका ठेवत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात महादेव पाटील यांच्यासह शुभम शेळके, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर व सरिता पाटील यांचा समावेश होता.29 सप्टेंबर रोजी पाचव्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होऊन सर्वांना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर तितक्याच रकमेच्या जामिनासह, पुन्हा असा प्रकार न घडविण्याच्या अटीवर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.या खटल्यात समिती नेत्यांचे कायदेशीर कामकाज वकील महेश बिर्जे, बाळासाहेब कागणकर, रिचमन रिकी व वैभव कुट्रे यांनी पाहिले. सुनावणीच्या वेळी मालोजी अष्टेकर, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, प्रकाश गडकरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*