LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी आबा हिंद क्लबच्या 13 जलतरणपटूंची अभिनंदनीय निवड*

Advertisement
राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी आबा हिंद क्लबच्या 13 जलतरणपटूंची अभिनंदनीय निवड

नुकत्याच मैसूर येथील मैसूर युनिव्हर्सिटीच्या जलतरण तलावात कर्नाटक राज्य शैक्षणिक खात्याच्या वतीने आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद क्लबचे जलतरणपटू व डायव्हिंग पटुनी उत्कृष्ट कामगिरी करताना 15 सुवर्ण 18 रौप्य 15 कांस्य अशी एकूण 48 पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. येत्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिल्ली येथील तालकटोरा जलतरण तलावात घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय एस जी एफ आय स्पर्धेसाठी पुढील 13 जणांची कर्नाटक राज्य संघात अभिनंदनीय निवड झाली आहे.

कुमारी वेदा खानोलकर, निधी मुचंडी, अवनी शहापूरकर,अनन्या रामकृष्ण, कनक हलगेकर, श्रेया जोगमनावर, तन्वी कारेकर, तन्वी मुचंडी, युवराज मोहनगेकर, वरद खानोलकर, अमोघ रामकृष्ण, वरून जोगमनावर, अर्णव चिवटे यांची अभिनंदन निवड झाली आहे. जलतरणपटूंनी केलेली कामगिरी पुढील प्रमाणे.

मुली 17 वर्षाखालील गट
वेदा खानोलकर जी जी चिटणीस स्कूल 100 मीटर बटरफ्लाय सुवर्ण 50 मीटर बटरफ्लाय,50 मीटर बॅक स्ट्रोक व 4x100 मीटर मिडले रिले रौप्य पदक, 4x100 मिटर फ्रीस्टाइल रिले कांस्यपदक. अनन्या रामकृष्णा डिव्हाईन प्रॉव्हिडन्स स्कूल 200 मीटर बॅक स्ट्रोक 4x100 मीटर मिडले रिले रौप्य पदक, 400 मीटर फ्रीस्टाइल व 4x100 मीटर फ्रीस्टाइल रिले कांस्यपदक. कुमारी अवनी शहापूरकर डिवाइन प्रॉव्हिडन्स 400 मीटर इंडिव्हिज्वल मिडले रौप्य 200 मीटर फ्रीस्टाइल कांस्यपदक.

17 वर्षाखालील मुलें
कुमार युवराज मोहनगेकर सेंट झेवियर्स 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग सुवर्ण, वरून जोगमनावर भरतेश स्कूल 1 मीटर डायव्हिंग रौप्य, 3 मीटर डायव्हिंग कांस्य पदक. प्रसाद सायनेकर श्रीशिवाजी विद्यालय यळृ्ळर 200 मीटर इनडिव्हिज्वल मिडले कांस्य. अनिश काकतकर सेंट झेवियर्स 4x100 मीटर फ्री स्टाईल रिले कांस्य पदक

14 वर्षाखालील मुली
निधी मुचंडी सेंट मेरीज 100 मीटर व 50 मीटर बॅकस्ट्रोक सुवर्ण 100मीटर फ्री स्टाईल,4x100 मीटर फ्रीस्टाल रिले व 4x100 मिटर मिडले रिले रौप्य. तन्वी कारेकर हेरवाडकर स्कूल 1मीटर 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग सुवर्णपदक. श्रेया जोगमनावर भरतेश स्कूल 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग ,4x100 मीटर फ्रीस्टाइल रिले रौप्य ,3 मिटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग कांस्य. कनक हलगेकर डिवाइन प्रॉव्हिडन्स स्कूल 50 मीटर बॅकस्ट्रोक व 4x100 मिडले रीले रौप्य. कुमारी तनवी मुचंडी डिवाइन प्रॉव्हिडन्स स्कूल 3 मिटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग रौप्य, 1 मीटर स्प्रिंग बोर्ड कांस्यपदक

14 वर्षाखालील मुले
वरद खानोलकर जी जी चिटणीस स्कूल 100 मीटर बॅक स्ट्रोक 4x100 मीटर मिडले रिले 1 मीटर स्प्रिंग बोर्ड व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग सुवर्णपदक. अमोघ रामकृष्ण सेंटपॉल्स स्कूल 50 मीटर बटरफ्लाय 4x100 मीटर मिडले रिले सुवर्ण 50 व 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक रौप्य 4x100 मीटर फ्रीस्टाइल रिले कांस्य. अर्णव चिवटे कामधेनु स्कूल 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग रौप्य 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग कांस्य. मोहित काकतकर सेंट झेवियर स्कूल 4x100 मीटर मिडले रिले सुवर्ण 200 मीटर इंडिव्हिज्युअल मिडले 4x100 मीटर फ्रीस्टाइल रिले कांस्य.

वरील सर्व जलतरणपटू हे आबा व हिंद क्लबचे सदस्य असून ते नियमितपणे कार्पोरेशनच्या गोवावेस, हिंद सोशल, तसेच अशोक नगर येथील 50 मीटर जलतरण तलावात नियमितपणे सराव करत असून त्यांना एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते, रणजीत पाटील, संदीप मोहिते, सतीश धनुचे, किशोर पाटील, भरत पाटील, मारुती घाडी, कल्लप्पा पाटील, यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच दक्षिणचे आमदार श्री अभय पाटील उत्तरचे आमदार श्री राजू शेठ, आबा हिंद क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, अरविंद संगोळी, राजू गडकरी, शुभांगी मंगळूरकर, सुनील हनमण्णावर यांचे प्रोत्साहन लाभते.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*