बेळगावात सुरु असलेल्या भारत आणि श्रीलंका देशाच्या मित्रशक्ती या संयुक्त सैनिकी कवायतीची सांगता झाली. फॉरेन ट्रेनिंग नोड येथे आयोजित समारोप कार्यक्रमात श्रीलंका आणि भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्या पंधरा दिवसापासून मित्रशक्ती या भारतीय आणि श्रीलंका सैन्याच्या लष्करी कवायती सुरु होत्या. दोन्ही देशातील संबंध वृद्धिंगत व्हावेत, सैन्यातील कौशल्याचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने भारत आणि श्रीलंका सैन्याच्या संयुक्त लष्करी कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. नक्षलवाद, दहशतवाद यांचा बिमोड करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती श्रीलंका सैन्याला देण्यात आली. विविध प्रकारच्या शस्त्रांच्या वापराची माहिती देखील दोन्ही सैन्यानी दिली. कमांडो विंग आणि मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथेही श्रीलंकन सैन्याला प्रशिक्षण देण्यात आले.

