LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*केएलएस आयएमईआरचा चौथा दीक्षांत समारंभ उत्साहात*

Advertisement
बेळगाव | प्रतिनिधी

के.एल.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च (KLS IMER), बेळगाव येथे चौथा दीक्षांत समारंभ शुक्रवार, 24 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभात एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 116 विद्यार्थ्यांना तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, तसेच गुणवंत पहिल्या 10 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक शैक्षणिक मिरवणुकीने (Academic Procession) करण्यात आली.

संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष श्री. यू. एन. कलकुंदरिकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संस्थेचे संचालक डॉ. आरिफ शेख यांनी शैक्षणिक वर्षातील प्रगतीचा सविस्तर अहवाल सादर केला.

या दीक्षांत समारंभात पार्वती मुरगोड हिने 8.61 CGPA मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिला सुवर्णपदक व ₹10,000 रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

श्रावणी यरंडोळे हिने 8.54 CGPA मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून तिला रौप्यपदक व ₹7,000 पारितोषिक, तर प्रगती कोलवेकर हिने 8.36 CGPA मिळवून तृतीय क्रमांक मिळवला व तिला कांस्यपदक व ₹5,000 रोख पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराजा उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात प्रामाणिकपणा, व्यावसायिक नैतिकता जपण्याचा सल्ला दिला. संकल्पनांची पक्की समज, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हेच यशाचे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

पद्मश्री पुरस्कार विजेते व आयआयएम अहमदाबादचे प्राध्यापक एमेरिटस प्रा. अनिल गुप्ता यांनी मुख्य भाषण करताना Upload–Download Ratio, समाजाभिमुख ज्ञान, नवोपक्रम, संशोधनातील मौलिकता व नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप सावकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या Alma Mater शी नाते जपावे, व्यावसायिक नैतिकतेसह यशाच्या शिखरावर पोहोचावे, असे आवाहन केले.

केएलएसचे अध्यक्ष श्री. ए. के. टागरे यांनी आयएमईआरच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास केएलएसचे विश्वस्त मंडळ सदस्य श्री. आर. एस. मुतालिक, श्री. पी. जी. बदाकुंद्री, श्री. प्रशांत कुलकर्णी, श्री. राजेंद्र बेळगावकर, श्री. एस. व्ही. गणचारी, श्री. व्ही. एम. देशपांडे, शैक्षणिक परिषद सदस्य, गव्हर्निंग बॉडी सदस्य, विद्यार्थी, पालक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*