*77 वा प्रजासत्ताक दिन मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा**
आज मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा व व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर होत्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय सेवानिवृत्त सैनिक श्री विजय हणमंत धामणेकर,एस.डी.एम.सी उपाध्यक्ष, सर्व सदस्य व सदस्या ,शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक होते या कार्यक्रम प्रसंगी पहिल्यांदा सर्वांचे पुष्प देऊन स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले.
यानंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन एस.डी.एम.सी. सदस्या सौ.अर्चना देसाई यांच्या हस्ते करण्यात आले तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन एस.डी.एम.सी.सदस्या सौ.ज्योती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, श्रीफळ शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री राजेन्द्र चलवादी यांनी वाढविले यानंतर ध्वजस्तंभ चे पूजन शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय सेवानिवृत्त सैनिक श्री विजय हणमंत धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आले नंतर ध्वजारोहण कार्यक्रम च्या अध्यक्षा सौ.दिव्या कुंडेकर यांनी केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना देऊन झाल्या नंतर प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय सेवानिवृत्त सैनिक श्री विजय हणमंत धामणेकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला नंतर गावातील गल्लोगल्ली मध्ये प्रभात फेरी काढून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आता च्या युगात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, पशूपक्षी संरक्षण,जी काळाची गरज आहे या आधारीत नाट्य नृत्य सादर करून गावातील जनतेला एक संदेश देत प्रभात फेरी काढून शाळेमध्ये इयता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाच्या आधारित भाषणे केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती एम एस मंडोळकर यांनी केले प्रमुख पाहुण्याचे आभार सहशिक्षिका सौ. ऐश्वर्या मेणसे यांनी मानले या कार्यक्रमाला शाळेचे एस.डी.एम.सी उपाध्यक्ष श्री जोतिबा उडकेकर, सदस्य श्री मारुती यळगुकर, श्री विजय धामणेकर, श्री जोतिबा पाटील, श्री दिनेश लोहार, श्री चांगदेव मुरकुटे,श्री शशिकांत पाटील, श्री मुर्तीकुमार माने, सदस्या सौ. प्रियंका साबरेकर,सौ.राजश्री सुतार, सौ.अलका कुंडेकर, सौ.रेश्मा काकतकर, सौ. मयुरी कुगजी, श्रीमती शुभांगी मुतगेकर,सौ.अर्चना देसाई,सौ.ज्योती पाटील, शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री राजेन्द्र चलवादी, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

