Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*राजर्षी शाहू विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*

शिनोळी बु. : ज्ञानदिप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिनोळी बु. येथे देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद परशराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजपूजन उपाध्यक्ष पुंडलिक पाटील यांनी केले.

यावेळी ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सूर्यवंशी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काशिनाथ पाटील यांनी महात्मा गांधी, विठ्ठल कृष्णा बोकमूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, नितीन नारायण पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज, शामराव चांभार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर पुंडलिक बाळू मेणसे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या रेखा शिवाजी तानगावडे, सुनीता शटुप्पा पाटील, विद्या प्रकाश गावडे, सुप्रिया शाम पाटील, सरिता रघुनाथ जाधव ,डॉ. ऐश्वर्या बाबू पाटील तसेच पोलीस पाटील जत्ती मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, राष्ट्रगीत, झेंडागीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत संचलन करून उपस्थितांची दाद मिळवली. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी आणि उत्साहाने भारावून गेला होता.

कार्यक्रमास संस्थेचे सचिव बी. डी. तुडयेकर, मुख्याध्यापक एन. टी. भाटे, सरपंच गणपत कांबळे, उपसरपंच पुंडलिक गवसेकर, तसेच रामकृष्ण सुतार, रघुनाथ गुडेकर, दौलत मेणसे, विनोद पाटील , यांच्यासह महिला ग्रामपंचायत सदस्या ,ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील सर यांनी केले. 

राष्ट्रभक्ती, सामाजिक एकोपा आणि देशसेवेचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*