बेळगावातील कॉलेज रोड परिसरात दुपारी साधारण एकच्या सुमारास एक कार अचानक पेट घेतल्याने परिसरात काही काळ खळबळ माजली. लिंगराज कॉलेजसमोर ही घटना घडली असून आग लागल्यानंतर गाडीचालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला उभी केली.
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत कार्यवाही केली आणि काही मिनिटांत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक तपासात बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
https://youtube.com/shorts/ZsbvHAlFFq4?si=lE6zDyKkgrcWe4d3
अचानक लागलेल्या आगीमुळे काही वेळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

