बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून भारताचे माजी उपपंतप्रधान डॉ. बाबू जगजीवन राम यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने शहरातील डॉ. बाबू जगजीवन राम उद्यान येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. डीसीपी लॉ अँड ऑर्डर नारायण बर्मनी यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
मिरवणूक वीर राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि एपीएमसी मार्गाने पुढे जात अखेर उद्यान परिसरात समाप्त झाली. या मिरवणुकीत विविध सांस्कृतिक पथके, कलाकार आणि आकर्षक मुखवटे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबू जगजीवन राम यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बेळगाव पोलीस आयुक्त भूषण राव बोरसे तसेच एसपी के. रामराजन यांनी अभिवादन केले.
यानंतर दीपप्रज्वलन करून व्यासपीठावरील कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. जगजीवन राम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.
या वेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजू तलवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष मल्लेश चौगुले, समाज नेते मल्लेश कुरंगी, लक्ष्मण लामाप्पगोल, बसवराज आरोळी, विठ्ठल पोळ, महादेव पोळ, बाबू पुजारी, बसवराज रायवगोल, जीवन कुरणे, सुधीर चौगुले, विनोद सोलापूर, गणेश काळे, संदीप कोलकर, हिरालाल चव्हाण, संदीप होंगल, भीमराव पवार, सिद्राय मैत्री, महादेव तलवार,आनंद कांबळे आदींची उपस्थिती लाभली.

