ठळकवाडी हायस्कूलच्या सभागृहात गर्भाशय कर्करोगावर व्याख्यान संपन्न.
एस के ई सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी येथे दिनांक 30 12 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ बेलगाम साउथ 3170 यांच्या वतीने सर्विकल कॅन्सर वर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक आर आर कुडतुरकर उपस्थित होते. आरसीबी एस चे अध्यक्ष डॉ. गोविंद मिसाळे, इव्हेंट चेअरमन रोटेरियन सतीश कुलकर्णी, रोटरियन सईगावी, रिसोर्स पर्सन म्हणून डॉक्टर अनिता उमदी (स्त्रीरोगतज्ञ) डॉक्टर अपूर्वा खानोलकर डॉक्टर शिल्पा, रोटरियन सविनय सीमनगौडर, शाळेचे जेष्ठ शिक्षक सी वाय पाटील, इंटरॅक्ट टीचर संजीव कोष्टी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सी वाय पाटील सर उपस्थित सर्व मान्यवरांचे फुल देऊन स्वागत केले. ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी, बालिका आदर्श विद्यालय, स्वाध्याय विद्यामंदिर या तिन्ही हायस्कूलच्या आई-पालकांनी अंदाजे 90 हून अधिक उपस्थिती दर्शविले होते. किरण गुरव सर व तिन्ही शाळेचे इंट्रॅक्ट टीचर उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषण क्लबचे प्रेसिडेंट डॉक्टर गोविंद मिसाळे यांनी केले.
कार्यक्रमाला उद्देशून डॉ. अनिता उमदी यांनी सर्विकल कॅन्सर एका वायरसामुळे त्याला कॅन्सरचे रूपांतर घ्यायला किती वर्षे लागतात याबद्दल त्यांनी सविस्तारपणे प्रोजेक्टर द्वारे माहिती दिली. एच पी व्ही व्हॅक्सिनेशन कोणत्या वयोमर्यादित असलेल्या मुलींना दिले जाते त्याबद्दल आपले विचार मांडले. व सर्विकल कॅन्सर आजार येऊ नयेत म्हणून एच पी व्ही व्हॅक्सिनेशन चे महत्व पटवून सांगितले. या कार्यक्रमात अनेक आई पालकांनी आपल्या मनातील प्रश्न विचारून डॉक्टरांच्या कडून सल्ला घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंट्रॅक्ट टीचर संजीव कोष्टी यांनी केले. आभार प्रदर्शन �

