आंबेडकर ट्रॉफीत थरार! AYC अजमनगर व SSS फाउंडेशनची दणदणीत सेमीफायनल एंट्री
डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर ट्रॉफी 2026 स्पर्धेत सेकंड क्वार्टर फायनल सामन्यांमध्ये रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. कांतारा बॉईज विरुद्ध AYC अजमनगर आणि ब्रामलिंग स्पोर्ट्स विरुद्ध SSS फाउंडेशन या सामन्यांमध्ये दोन्ही विजेत्या संघांनी प्रभावी कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला.
👉 कांतारा बॉईज vs AYC अजमनगर
या सामन्यात AYC अजमनगरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांतारा बॉईजकडून सिद्धूने 14 चेंडूत 14 धावा करत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला, तर किशोरने 11 चेंडूत 12 धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात AYC अजमनगरकडून अनिकेतने आक्रमक फलंदाजी करत 7 चेंडूत 17 धावा (4 चौकार, 1 षटकार) केल्या. विश्वजीतनेही 4 चेंडूत 10 धावा करत संघाला गती दिली.
गोलंदाजीत आदर्शने 2 षटकांत 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तर किशोरने 1 बळी मिळवला. मात्र, AYC अजमनगरने 7 विकेट्स राखून सामना जिंकला.
👉 या सामन्यात एझाज एम याला ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले. त्याने 2 षटकांत फक्त 4 धावा देत तब्बल 4 विकेट्स घेतल्या. अनिकेतनेही 3 विकेट्स घेत उत्कृष्ट साथ दिली.
👉 ब्रामलिंग स्पोर्ट्स vs SSS फाउंडेशन
पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये ब्रामलिंग स्पोर्ट्सने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. त्यांनी 8 षटकांत 7 बाद 80 धावा उभारल्या. सचिन कानोजिया याने 15 चेंडूत 34 धावा (2 चौकार, 3 षटकार) करत संघाचा डाव सावरला, तर राजा शर्मा याने 8 चेंडूत 17 धावा केल्या.
SSS फाउंडेशनकडून झैद खानने 2 षटकांत केवळ 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. राहुल जोगाडियानेही 2 बळी घेतले.
81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना SSS फाउंडेशनने दमदार फलंदाजी करत 7 षटकांत 3 बाद 84 धावा करत विजय मिळवला. सुमित धेकले (29) आणि अश्रफ खान (16) यांनी निर्णायक खेळी केली.
👉 SSS फाउंडेशनने 7 विकेट्सने विजय मिळवत सेमीफायनल गाठली. झैद खान याला ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले.

