आराध्या सावंत हिची राज्य कराटे स्पर्धेसाठी निवड.
बेळगाव ता,4. कॅम्पमधील सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी आराध्या निवास सावंत हिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे.
सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत 38 किलो वजनी गटात आराध्या सावंत हिने सुवर्णपदक पटकाविले होते आता तिची 5 नोव्हेंबरपासून दावणगिरी येथे होणाऱ्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिला कराटे प्रशिक्षक विनायक मोरे, शाळेचे क्रीडाशिक्षक चेस्टर रोझारियो, ज्युलेट फर्नांडिस, दीपा सत्तेगिरी, मानस नायक, रवी मालशेट यांचे मार्गदर्शन तर शाळेचे प्राचार्य फादर सिरीयल बॅग्स, उपप्राचार्य लेस्टर डिसोजा व आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे.

