गेल्या सहा वर्षांपासून आमदार अभय पाटील हे शहरातील वेगवेगळ्या शाळामध्ये आईस्क्रीम उत्सव आयोजित करून उन्हाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना आईस्क्रीम खाण्याचा आनंद अनुभवायला देत आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आईस्क्रीम खाताना आनंद पाहायला मिळतो. आईस्क्रीम उत्सवात आमदार अभय पाटील यांचे कार्यकर्ते आईस्क्रीमची गाडी घेऊन शाळेत दाखल होतात आणि विद्यार्थ्यांना आईस्क्रीम वितरित करतात.
- वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम विद्यार्थ्यांना दिले जातात. बालवयात तर आईस्क्रीमचे आकर्षण खूप असते. बऱ्याच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आईस्क्रीम विकत घेऊन खाणे शक्य नसते. पण आमदार अभय पाटील यांनी सुरु केलेल्या आईस्क्रीम उत्सवमुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या प्रारंभीच आईस्क्रीम खाण्याचा आनंद मिळाला हे मात्र नक्की.

