बेळगाव : शहरातील मादक पदार्थविरोधी मोहिमेला गती देत, सिटी क्राईम ब्रांच (CCB) पोलिसांनी हेरॉईनची विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई 26 नोव्हेंबर 2025 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस चिल्ड्रेन्स पार्क परिसरात करण्यात आली.
अटक केलेल्या व्यक्तीची ओळख महमद्दाहिद अतीकुर्रहमान मुल्ला (27), रहिवासी : 12वा क्रॉस, उज्वलनगर, बेळगाव अशी समोर आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी हेरॉईनची विक्री करत असल्याची माहिती CCB पथकाला मिळाली होती. त्यानंतर पीएसआय मंगेश भजनत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 7.56 ग्रॅम हेरॉईन (अंदाजे किंमत ₹15,800),एक Oppo Reno 6 मोबाइल फोन (मूल्य ₹10,000) अशी एकूण ₹25,800 किंमतीची मालमत्ता जप्त केली.
प्राथमिक चौकशीत आरोपीने, हा माल मुंबईतील संतोष नावाच्या व्यक्तीकडून मिळाल्याची माहिती दिली. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 83/2025, कलम 21(b), NDPS Act अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्त तथा डीसीपी यांनी CCB पथकाचे कौतुक केले आहे.

