बेळगाव तालुक्यात ईद-मिलाद मिरवणुकीनिमित्त मद्यविक्री बंदी
बेळगाव : ईद-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव तालुक्यात मद्यविक्रीवर बंदी जाहीर केली आहे.
१३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून ते १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. या कालावधीत दारू विक्री दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब तसेच हॉटेल्समधील दारू विक्री आणि वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१४ सप्टेंबर रोजी ईद-मिलाद उत्सवाची मिरवणूक काढण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. निवासी जिल्हाधिकारी विनायकुमार होनकेरी आणि शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी हा आदेश बजावला आहे.
कायद्याची अंमलबजावणी आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

