कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रामचंद्र राव बंगलोर येथील आपल्या कार्यालयात एका महिलेशी अश्लील चाळे करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याची चौकशी करून कारवाई केली जाईल असे माध्यमाशी बोलताना सांगितले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक रामचंद्र राव हे आपल्या कार्यालयात एका महिलेच्या सोबत अश्लील चाळे करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गणवेश परिधान केलेला असताना कार्यालयात त्यांनी हे कृत्य केले आहे. दोन तीन वेळा आपल्या कार्यालयात त्यांनी हे चाळे महिले सोबत केले आहेत.वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या या रंगेल पणामुळे खळबळ उडाली आहे आणि चर्चेचा विषय झाला आहे. कायद्या पेक्षा कोणीही मोठा नाही. चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माध्यमाशी बोलताना दिले.

