बेळगाव येथील श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात अक्षय तृतीया, शिवजयंती आणि परशुराम जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. या निमित्ताने मंदिरात विशेष रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यंदा मंदिरात हापूस आंब्यांपासून साकारलेली आकर्षक आरास हे विशेष आकर्षण ठरले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फ्रुट मार्केटमधील प्रसिद्ध आंबा व्यापारी तुषार बर्डे यांच्या वतीने आंब्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
या धार्मिक सोहळ्यावेळी मंदिराचे ट्रस्टी, सेवेकरी तसेच अनेक भक्त उपस्थित होते. श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक उत्साहात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

