LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*"बेळगाव नगरीत ' एपीजे अब्दुल कलाम चषक ' कॅरम स्पर्धेचे आयोजन*

Advertisement
बेळगाव नगरीत ' एपीजे अब्दुल कलाम चषक ' कॅरम स्पर्धेचे आयोजन : दिली जाणार 2,85000 रुपयांची पारितोषिके

बेळगाव : बेळगाव नगरीत दोन दिवशीय एपीजे अब्दुल कलाम ट्रॉफी- सिझन-1 ' ऑल इंडिया ओपन कॅरम टूर्नामेंट 'चे आयोजन करण्यात आले आहे.
ही कॅरम स्पर्धा आरटीओ नजीकच्या एलआयसी कार्यालयासमोरच्या डॉ. जे.टी. सीमन्ड्स हॉल ( कित्तूर चन्नम्मा मार्ग ) बेळगाव येथे मंगळवार दि. 4 नोव्हेंबर आणि बुधवार दि. 5 नोव्हेंबर अशी दोन दिवस चालणार आहे.
ही स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते अझीम एस. पटवेगार यांनी पुरस्कृत केली असून स्पर्धकांना एकूण 2 लाख 85 हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
कॅरम डबल बेस, कॅरम सिंगल बेस आणि थंब कॅरम सिंगल अशा तीन प्रकारात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.
कॅरम डबल बेसच्या विजेत्या स्पर्धकाला 50 हजार रुपये तर उपविजेत्याला 30 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 20 हजार रुपये आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्याला 10 हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

कॅरम सिंगल बेसमधील विजेत्या स्पर्धकाला 25 हजार रुपये तर उपविजेत्याला 15 हजार रुपयांचे तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 10 हजार रुपये तर चौथ्या क्रमांकाच्या विजेत्याला 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
थंब कॅरम सिंगल स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला 50 हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 30 हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 20 हजार रुपये तर चौथ्या क्रमांकाच्या विजेत्याला10 हजार रुपये तसेच पाचव्या ते आठव्या क्रमांकांच्या विजेत्यांना प्रत्येकी 2500 रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
कॅरम डबल बेससाठी 800 रुपये, कॅरम सिंगल बेससाठी 500 रुपये तर थंब कॅरम सिंगलसाठी 600 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. इच्छुकांनी सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत आपली नावे नोंदवायची आहेत.

4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू ) सेठ यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी स्पर्धा आयोजक गिरीश बाचीकर. मो. क्र : 8050160834, सचिव शहाबाज सानवाले. मो. क्र : 9611100674, इरफान हुदली. मो. क्र : 9964358259 अथवा अब्बास नदाफ. मो. क्र : 8497003147 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*