LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव APMC नेमदी केंद्रात मनमानी कारभार*

Advertisement
बेळगाव :
APMC परिसरात असलेले नेमदी सेवा केंद्राचा उद्देश नागरिकांना इन्कम सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र अशा महत्त्वाच्या कागदपत्रांचा सुरळीत व जलद पुरवठा करणे हा होता. मात्र प्रत्यक्षात या केंद्रातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे.

सकाळी फक्त एक-दोन तास केंद्र उघडे राहते, तर दुपारी “जेवणाला जातो” या कारणाखाली अधिकारी केंद्र बंद करतात. जेवणानंतर परत येतात की नाही—याचा काही ठावठिकाणा नसल्याने, प्रमाणपत्रांसाठी आलेल्या नागरिकांना निष्फळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक नागरिकांनी तक्रार केली की “येथील अधिकारी येईल तेव्हा येतात आणि मनाला येईल तेव्हा जातात. आम्ही तासन्तास रांगेत उभे राहतो, पण कार्यालय उघडेल याची खात्रीही नसते.”

या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, नोकरभरती प्रक्रियेत असलेल्या युवकांचे तसेच तातडीच्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असलेल्या नागरिकांचे काम खोळंबत आहे.

नागरिकांनी प्रशासनाला कडक मागणी करत सांगितले की—
➡ हे केंद्र नियमित वेळेत आणि कायमस्वरूपी सुरु राहावे,
➡ अनियमित उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,
➡ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता आणावी.

सार्वजनिक सेवांचा हेतू लोकांना सुविधा देण्याचा असताना, प्रत्यक्षात येथे “सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी” उघडपणे दिसून येत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या सेवेला शिस्तबद्ध करावे, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*