स्विमिंग पुलमध्ये पोहत असताना लष्करी अधिकाऱ्याचा हृदयघाताने मृत्यू झाल्याची घटना बेळगावातील नानावाडी येथील कमांडो विंग येथे घडली.कमांडो प्रशिक्षण दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
मूळचा हरियाणा येथील असलेला लेफ्टनंट अमित सिंग हा कमांडो विंग येथे कमांडो प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षण दरम्यान स्विमिंग पूल मध्ये पोहत असताना अमित सिंग याला हृदय विकाराचा झटका आला. यावेळी लाईफ गार्ड प्रदीप कुमार याने अमित सिंग यांना त्वरित पाण्यातून बाहेर काढले. अमित सिंग यांना लष्करी रुग्णवाहिकेतून त्वरित जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

