Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*मराठी सन्मान यात्रेपूर्वी महाडच्या चवदार तळ्याला अभिवादन; सीमाप्रश्नी न्यायाच्या लढ्याचा निर्धार*

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने 200 ते 225 कार्यकर्ते दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत, किल्ले रायगड येथे जाण्यापूर्वी रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी दुपारी रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला व क्रांती भूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

महाड शहराच्या मध्यभागी असलेले चवदार तळ्याला ऐहासिक व सामाजिक महत्व असून या तळ्यामधील पाणी अस्पृश्याना वापरण्यास बंदी होती, त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह करून या तळ्यातील पाण्याचा वापर समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले व 20 मार्च 1927 ला या तळ्यातील पाण्याचा वापर सर्वांसाठी खुला झाला.

याच चवदार तळ्याला आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केले.

या स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. रवींद्र साळवे यांनी समिती कार्यकर्त्यांची सर्वांचे स्वागत करून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव सांगितला व सीमाप्रश्नी आपण सदैव सीमावासीयांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली. या बाबासाहेबांच्या स्मारकाचे प्रशांत जाधव,दीपक घाडगे,प्रदीप सकपाळ हे पदाधिकारी उपस्थित होते.

तर अध्यक्ष शुभम शेळके यांनी ज्या बाबसाहेबांनी या देशाची घटना लिहिली व त्यांच्याच संविधानावर या देशाची लोकशाही चालते, याच संविधानावर विश्वास ठेवून आम्ही सीमावाशीय गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने लढत आहोत, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सीमाप्रश्नी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.

या वेळी कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेबांचा विजय असो,बेळगाव, कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर,महादेव पाटील,शिवाजी हवळाणाचे,मोतेश बारदेशकर,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर,अशोक घगवे, श्रीकांत नांदूरकर,सुरज जाधव,सचिन दळवी,ऍड.वैभव कुट्रे,मांणगावचे रायगड जिल्हा प्रतिनिधी,पत्रकार नरेश पाटील,रमेश माळवी, भूपाल पाटील, महेंद्र जाधव,सुशांत देसाई,निखिल देसाई, प्रकाश हेब्बाजी,आदी उपस्थित होते.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test 2*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*