नवीन वर्षातील पहिला पाऊस बेळगावकर जनतेने अनुभवला. सायंकाळी बेळगाव आणि परिसरात अचानक पावसाने हजेरी लावली.
सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली.
रस्त्याच्या कडेला बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे साहित्य पावसात भिजून गेले. कामावरून घरी जाणाऱ्या नोकरवर्ग आणि विद्यार्थ्यांना देखील पावसापासून बचावासाठी आडोसा शोधावा लागला. अवकाळी आलेल्या पावसाचा चणे, मोहरी, वाटाणे पिकाला उपयोग होणार आहे.

