LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये बेळगावचा दबदबा*

Advertisement
बेळगाव :
हैदराबाद येथे पार पडलेल्या 25 व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या दिव्यांग जलतरणपटूंनी सुवर्णकामगिरी सादर करत नवा इतिहास रचला आहे. केवळ सहभाग नव्हे तर वर्चस्व सिद्ध करत पथकाने एकूण 59 पदकं पटकावली असून त्यात 37 सुवर्ण, 14 रौप्य व 8 कांस्य पदकांचा समावेश आहे.

या भव्य यशामुळे कर्नाटक राज्याला सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवून देताना बेळगावच्या जलतरणपटूंनी सिंहाचा वाटा उचलला आहे.

15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान गाचीबोवली, हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात आयोजित या प्रतिष्ठेच्या चॅम्पियनशिपमध्ये देशभरातील 30 राज्यांतील 450 हून अधिक अव्वल पॅरा स्विमर्स सहभागी झाले होते. मात्र या स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या 21 जलतरणपटूंनी अविस्मरणीय प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधले.

बेळगावच्या जलतरणपटूंच्या पदकांची झळाळणी:

(नाव – श्रेणी – सुवर्ण / रौप्य / कांस्य)

श्रीधर माळगी – शारीरिक अपंग – 5 / 0 / 0

स्वातीक पाटील – शारीरिक अपंग – 5 / 0 / 0

प्रज्वल हणमनट्टी – दृष्टिहीन – 3 / 0 / 0

सिमरन गौंडाळकर – ठेंगू – 3 / 0 / 0

सोनम मल्लू पाटील – दृष्टिहीन – 3 / 0 / 0

साक्षी मल्लू पाटील – दृष्टिहीन – 3 / 0 / 0

पृथ्वी नरळेकर – दृष्टिहीन – 3 / 0 / 0

अनिकेत पिळणकर – शारीरिक अपंग – 2 / 1 / 0

साहिल जाधव – शारीरिक अपंग – 2 / 0 / 1

प्रज्वल नरळेकर – 2 / 0 / 0

शरण्या कुंबार – बौद्धिकदृष्ट्या कमजोर – 2 / 0 / 0

अमोल कांबळे – शारीरिक अपंग – 1 / 1 / 1

राघवेंद्र अणवेकर – शारीरिक अपंग – 1 / 1 / 1

अमोघ तंगडी – दृष्टिहीन – 1 / 1 / 1

आकाश हंजी – दृष्टिहीन – 1 / 0 / 0

बुशरा मुजावर – बौद्धिकदृष्ट्या कमजोर – 0 / 3 / 0

चिन्मय क्यमन्नावर – दृष्टिहीन – 0 / 3 / 0

सुमित मुतगेकर – शारीरिक अपंग – 0 / 2 / 1

रम्या लमाणी – दृष्टिहीन – 0 / 2 / 0

पार्थ दानोजी – शारीरिक अपंग – 0 / 0 / 2

सुकृथ यल्लाहट्टी – दृष्टिहीन – 0 / 0 / 1

केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी ऑलिंपिक आकाराच्या जलतरण तलावात नियमित प्रशिक्षण घेत असलेल्या या शूर जलतरणपटूंना मुख्य प्रशिक्षक उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर व विनायक आंबेवाडीकर यांचे कसून प्रशिक्षण मिळाले.

तसेच या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (जयभारत फाउंडेशन), राम मल्ल्या (द अलाईड फाऊंडर्स प्रा. लि.), एसएलके ग्रुप, डॉ. नितिन खोत, रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर यांचे सहकार्य लाभले.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*