Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*‘घाबरून पेट्रोल भरू नका’; बेळगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन*

बेळगाव शहरात पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त भूषण राव बोरसे आणि उपायुक्त एन. व्ही. बर्मनी यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त कार्यालयात शहरातील पेट्रोल पंप चालकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण होऊ नये, तसेच इंधन वितरण सुरळीत राहावे यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्व पेट्रोल पंपांवर “पुरेसा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध आहे” असे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून नागरिकांनी घाईघाईने इंधन खरेदी करण्याचे टाळावे.

सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच पंप परिसरात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यासाठी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जवळील पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, शहरातील पेट्रोल पंपांवर २४ तास पोलीस गस्त ठेवण्यात येणार असून, पंप चालक आणि कर्मचाऱ्यांना संपूर्ण सुरक्षा पुरवली जाईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test 2*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*