LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*स्कूल गेम्स 2025 : राज्यस्तरीय स्पीड स्केटिंगमध्ये बेळगावच्या स्केटर्सची घवघवीत कामगिरी*

Advertisement
बेळगाव | प्रतिनिधी

स्कूल गेम्स 2025 अंतर्गत कर्नाटक राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेला नवा गौरव मिळवून दिला आहे. बेंगळुरू येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 300 हून अधिक नामवंत स्केटर्स सहभागी झाले होते.

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनमार्फत निवड झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, वेग आणि सातत्य दाखवत एकूण 13 पदकांची कमाई केली. यात 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे.

🥇 पदक विजेते खेळाडू

जानवी तेंडूलकर – 2 सुवर्ण

रश्मीता आंबिगा – 2 रौप्य, 1 कांस्य

आराध्या पी. – 1 सुवर्ण, 1 रौप्य

शल्य तरळेकर – 1 रौप्य, 1 कांस्य

ऋत्विक दुबाशी – 1 रौप्य

अवनीश कामन्नवर – 1 रौप्य, 1 कांस्य

करुणा वाघेला – 1 कांस्य

हे सर्व स्केटर्स के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे नियमित सराव करतात. प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश मिळवले.

या यशासाठी स्केटर्सना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर तसेच कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.

या कामगिरीमुळे राज्यस्तरावर बेळगावच्या स्केटिंगपटूंची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*