Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Sports News

*बेळगावच्या जलतरणपटूंचा जलवा! ‘वीर सावरकर चषक’वर स्विमर्स क्लबचा कब्जा*

कोल्हापूर येथे पार पडलेल्या वीर सावरकर चषक जलतरण स्पर्धा-2026 मध्ये बेळगावच्या Swimmers’ Club Belgaumच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 8 आणि 9 ऑगस्ट रोजी इचलकरंजी, कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी तब्बल 85 पदकांची कमाई करत आपला दबदबा निर्माण केला.

या पदकांमध्ये 42 सुवर्ण, 29 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर स्विमर्स क्लब बेळगावने General Championship Trophy आपल्या नावावर केली.

 बेळगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. क्लबच्या Sailee S Ghugretkar, Saiesha R Patil आणि Sarthak Shreyakar यांनी आपल्या-आपल्या वयोगटात सातत्यपूर्ण कामगिरी करत Individual Championshipचा मान मिळवला.

विशेष म्हणजे, साईली घुग्रेतकर हिने तब्बल 7 सुवर्णपदके जिंकत स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. साईशा आर. पाटील हिने 6 सुवर्ण आणि 1 रौप्य, तर सार्थक श्रेयकरने 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवले.

क्लबच्या यशात अनेक जलतरणपटूंचे योगदान राहिले. भगतसिंग बी. गावडे यांनी 3 सुवर्ण आणि 4 रौप्य, श्रीदत्ता डी. पुजारी यांनी 3 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य, तर समिक्षा घसारी यांनी 3 सुवर्ण व 2 रौप्य पदके मिळवली.
दार्शिका नित्तूरकरने 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य; आराध्या पी.ने 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य; तर वैशाली घाटेगस्तीने 2 सुवर्ण व 2 रौप्य पदके पटकावली.

कृषा कुलकर्णीने 2 सुवर्णपदके मिळवली. वेदांत व्ही. तारळेने 1 सुवर्ण व 3 रौप्य, आयुष मुतकेकरने 1 सुवर्ण, 2 रौप्य व 3 कांस्य, तर अद्विका पी.ने 1 सुवर्ण व 2 रौप्य पदके जिंकली.

स्कंद आर. घाटगे, मुहम्मद हमजा गोकाक, वीरा व्ही. तारळे आणि आरवी मुतकेकर यांनीही सुवर्णपदकांची कमाई केली. अभ्यंत पवार, स्वाराली शिवांगेकर आणि रुद्र डी. पुजारी यांनी रौप्य व कांस्य पदके मिळवत संघाच्या पदकसंख्येत भर घातली. इफ्रा गोकाक, मुहम्मद अली गोकाक आणि रितू लाड यांनीही कांस्यपदक पटकावले.

या सर्व जलतरणपटूंना बेळगावातील सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल (ऑलिम्पिक आकार) आणि KLE International Swimming Pool येथे नियमित प्रशिक्षण दिले जाते.

क्लबचे मार्गदर्शक उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकटकर, महेश पवार आणि विनायक अंबेवाडीकर यांच्या प्रशिक्षणातून खेळाडूंनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.

या स्पर्धेला Maharashtra State Amateur Aquatic Association आणि Kolhapur Zilla Amateur Aquatic Association यांची मान्यता होती.
बेळगावच्या जलतरणपटूंच्या या घवघवीत यशामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा मान उंचावली आहे.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*