बेळगावच्या स्केटर्सनी राज्यस्तरीय स्पर्धेत गाजवली धमक!
बेळगाव, 27 ऑक्टोबर :
कर्नाटकातील ४१व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी चमकदार कामगिरी करत एकूण २६ पदके (१३ सुवर्ण, ८ रौप्य, ३ कांस्य) पटकावली आहेत. ही स्पर्धा तुमकूर आणि बेंगळुरू येथे पार पडली होती. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातील २०० हून अधिक नामवंत स्केटर्सनी सहभाग घेतला होता.
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनमार्फत निवड झालेल्या स्केटर्सनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत राज्य पातळीवर बेळगावचा झेंडा उंचावला.
🏅 पदक विजेते स्केटर्स:
देवेन बामणे – 1 सुवर्ण
साईराज मेंडके – 2 सुवर्ण
हिरेन राज – 1 सुवर्ण, 1 रौप्य
दृष्टी अंकले – 1 सुवर्ण, 1 रौप्य
अवनीश कोरिशेट्टी – 1 सुवर्ण, 1 रौप्य
मनन अंबीगा – 1 सुवर्ण
जयध्यान राज – 2 रौप्य
रश्मीता अंबीगा – 2 रौप्य
अभिषेक नावले – 1 रौप्य
खुशी आगशिमनी – 2 रौप्य
अथर्व हडपद – 1 कांस्य
अन्वी सोनार – 1 सुवर्ण
शेफाली शंकरगौडा – 1 सुवर्ण
खुशी घोटीवरेकर – 1 सुवर्ण
सई शिंदे – 1 सुवर्ण
मुद्धलसिका मुलाणी – 1 सुवर्ण
आहद मुलाणी – 1 सुवर्ण
ही सर्व स्केटर्स के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गंगणे आणि योगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
तसेच या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर आणि कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरले.

