कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील कुस्तीपटू भक्ती रणजीत पाटील हिने म्हैसूर येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या दसरा चषक कुस्ती स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले.
याचबरोबर सीएम चषक स्पर्धेत 55 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदकावर नाव कोरले.
ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर झेपावत असलेल्या भक्तीने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने गावाचे नाव उंचावले आहे. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, गावकरी व क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भक्ती पाटीलच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आगामी स्पर्धांमधील यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

