LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शेकडो महिलांची फसवणूक करणारा भामटा अखेर पोलीसांच्या ताब्यात*

Advertisement
बेळगाव :
घरबसल्या रोजगाराचे आमिष दाखवून शेकडो महिलांची आणि काही ऑटोचालकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला शहापूर पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. अगरबत्ती पॅकिंगचे काम देतो असे सांगून या आरोपीने महिलांकडून आगाऊ पैसे घेऊन लाखो रुपयांचा गंडा घातला होता.

‘बी.एम. ग्रुप महिला गृहोद्योग’ या नावाने संस्थेचा बनावट गृहोद्योग सुरू असल्याचे दाखवून प्रत्येक महिलेकडून ₹2,500 रुपये नोंदणी शुल्क म्हणून घेतले जात होते. त्यानंतर “काम मिळाल्यावर ₹3,000 मजुरी दिली जाईल” असे आश्वासन दिले जात होते. मात्र, पैसे घेतल्यानंतर काम न देता आरोपी फरार झाला.

या फसवणुकीमुळे शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून न्यायाची मागणी केली होती. तसेच पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन आरोपीला अटक करण्याचा इशारा दिला होता.

या प्रकरणी लक्ष्मी आनंद कांबळे (रा. पाटील गल्ली, खासबाग) यांनी 25 ऑक्टोबर 2025 रोजी शाहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तपासादरम्यान आरोपीचे नाव बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर (वय 35, रा. जाळोळी, ता. पंढरपूर, सध्या पुऱसंघी, पुणे) असे समोर आले.

4 नोव्हेंबर 2025 रोजी शहापूर पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या. या तपासात पीएसआय मणिकंठ पुजारी, श्रीमती एस. एन. बसवा, मनोज भजंत्री (सीसीबी) तसेच एस. एम. गुडडाईगोल, श्रीधर तळवार, अजीत शिपूरे आणि रमेश अक्की (तांत्रिक पथक) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या पथकाच्या कार्याची बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी प्रशंसा केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, रोजगाराच्या आमिषाला बळी न पडता संस्थेची पडताळणी करूनच व्यवहार करावा.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*