बेळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्य भाजपकडून विरोधी पक्षनेते श्री. आर. अशोक, माजी मंत्री श्री. सी. टी. रवी व श्री. एन. रवीकुमार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या.
या वेळी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री. रमेश जारकीहोळी, श्रीमती शशिकला जोल्ले, आमदार अभय पाटील, श्री. विठ्ठलराव हळगेकर, श्री. संजय पाटील, माजी उपमुख्यमंत्री श्री. सिद्धू सवडी, आमदार श्री. दुर्योधन आयहोलेंनी दौऱ्यात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार श्री. इराणा कडाडी, खासदार श्री. रमेश जिगजिनागी तसेच जिल्हाध्यक्ष श्री. सुबस पाटील आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नेत्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष पाहून त्यांच्या समस्या ऐकल्या. पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. स्थानिक जनता व शेतकरी वर्गाने शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली.

