हुबळी येथे पोलिसांनी महिला भाजप कार्यकर्त्यावर पोलीस वाहनात मारहाण करून तिला विवस्त्र केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्ष आणि भाजप महिला मोर्चातर्फे मोर्चा काढून पोलीस खात्याचा आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला.
दोन दिवसापूर्वी बुधवारी हुबळीतील केशवापूर पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्या सुजाता हंडी यांना काँग्रेस नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीवरून ताब्यात घेऊन पोलीस वाहनात मारहाण करून विवस्त्र केल्याची घटना घडली होती.
या घटनेचा भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे वीर राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. जनतेचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे पण याच तत्वाला हुबळी पोलीसांनी काळिमा फासला आहे. दोषी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप तर्फे राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

